घरव्हिडिओनिफाड तालुक्यात पावसाचा जोर वाढला, गोदामाईने धारण केलं रौद्र रूप

निफाड तालुक्यात पावसाचा जोर वाढला, गोदामाईने धारण केलं रौद्र रूप

Related Story

- Advertisement -

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेशवर बंधाऱ्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे, एरवी संथ वाहणाऱ्या गोदामाईचे रौद्र रूप सध्या नाशिककरांना पाहायला मिळत आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने इथल्या छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे, वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. गंगापूर, दारणा, भावली अशा सर्वच धरणांतून विसर्ग झालेले पाणी नांदूरमध्यमेश्वर मध्ये येत आहे. त्यामुळे इथल्या पाण्याची पातळी वाढली आहे.

- Advertisement -