घरव्हिडिओवैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉप्टर प्रशिक्षण

वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉप्टर प्रशिक्षण

Related Story

- Advertisement -

जळगाव विमानतळावर विमान, हेलिकॉप्टर चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा केंद्र सरकारचा परवाना मिळाला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशिक्षण हब होईल. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही चांगली सधी आहे, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. या बाबत माहिती देताना ते म्हणाले, “देशभरात सात विमानतळाना विमान चालविण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यााठी परवानगी देण्यात आली आहे. त्यात जळगाव विमानतळाचा समावेश आहे. यासोबतच हेलिकॉप्टर प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता जळगाव विमान, हेलिकॉप्टर प्रशिक्षणाचे हब होईल. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. येत्या ऑक्टोंबर, नोव्हेंबरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्रशिक्षणास सुरुवात होईल”, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय जळगाव येथून जळगाव पुणे, जळगाव इंदूर ही विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे.

- Advertisement -