मी बिनधास्त नाही, नाॅर्मल आहे.- हेमांगी कवी

सोशल मिडियावर नेहमीच बोल्ड-बिनधास्त विधानं करणारी मराठी अभिनेत्री हेमांगी कवी. जे जे स्कूल आॅफ आर्टमधून डिग्री घेऊन बाहेर पडली. तिने काही काळ वेब डिझायनर म्हणून नोकरी केली. पण त्यात मन रमले नाही म्हणून पुढे एकांकिकांतून व्यावसायिक नाटक, टेलिविजन, चित्रपट हा सारा प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून ‘माय महानगर मानिनी’ वर टिपला आहे. यात हेमांगीने नाटक, चित्रपट राजकिय, सामाजिक अशा सर्व अंगांनी भाष्य केले आहे.