काल आणि उद्याच्या चिंतेपेक्षा आज मनसोक्त जगावं मनिषा म्हैसकर

वडिलांकडून प्रशासकीय सेवेचं बाळकडू मिळाल्यानंतर आता प्रगल्भ, बुद्धिमान सनदी अधिकाऱ्याची पत्नी असताना प्रत्येक काम करताना एक वेगळी सजगता जपावीच लागते. १९९२ बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या मनीषा पाटणकर- म्हैसकर या अनेकांसाठी ‘रोल मॉडेल’ आहेत. मात्र प्रशासनातील कित्येक अधिकाऱ्यांसाठी त्या ‘मिसेस परफेक्शनिस्ट’ म्हणूनही परिचयाच्या आहेत. हाती असलेलं काम पूर्ण होण्यापेक्षा ते ‘परफेक्ट’ व्हावं हाच त्यांचा आग्रह असतो. आणि तेच त्यांच्या यशाचं सूत्र आहे.