घरव्हिडिओनाशिकच्या मुकणे धरणात अवैध मासेमारी

नाशिकच्या मुकणे धरणात अवैध मासेमारी

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरणात अवैधरित्या मासेमारी केली जाते. धरणातील झिंगा मासा पकडण्यासाठी विषारी कीटकनाशक टाकले जाते. मासे धरण्याच्या किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना पकडून स्थानिक बाजारपेठेमध्ये विकले जाते. परंतु या धरणातील १२५ एमएलडी पाण्याचा विसर्ग रोज नाशिक जिल्ह्यासाठी केला जातो. या विषारी पाण्यामुळे मात्र मासेमारांच्या जीवघेण्या ‘उदोगा’मुळे नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे मासे स्थानिक बाजारपेठेमध्ये विकल्यामुळे स्थानिकांचाही आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेने व लघु पाटबंधारे विभागाकडे तक्रार केल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन येथे येऊन संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -