- Advertisement -
पोलीस दलातील आणखी एका लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. पिपंरी-चिंचवडमध्ये माजी आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र समोर आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रामध्ये कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी रुपयांची वसूली गोळा करण्यात आली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. पिपंरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणातून २०० कोटी गोळा करण्यात आले असल्याचा आरोप सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पत्र लिहून केले आहेत.
- Advertisement -