Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आव्हाडांच्या तत्कालीन बॉडीगार्डच्या आत्महत्येला वेगळं वळण

आव्हाडांच्या तत्कालीन बॉडीगार्डच्या आत्महत्येला वेगळं वळण

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आले. जितेंद्र आव्हाड मंत्री असताना वैभव कदम हे त्यांचे बॉडीगार्ड होते. त्यांच्या या कार्यकाळातच अनंत करमुसे यांना मारहाण केली असल्याचे प्रकरण समोर आले होते. अनंत करमुसेंना जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील घरी मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी कदम यांनासुद्धा अटक केली होती. वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा यादरम्यान रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केली. मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमुळे आणि कदम यांच्या शेवटच्या स्टेटसमुळे वैभव कदम यांनी खरच आत्महत्या केली की, एखादे सत्य बाहेर येऊ नये, म्हणून हत्या करण्यात आली, असा संशय निर्माण होतो. तुम्हाला काय वाटत ते आमच्यापर्यंत नक्की कळवा

- Advertisement -