घरव्हिडिओवानखेंडेवर घेतलेल्या आक्षेपावर नवाब मलिकांचे मत

वानखेंडेवर घेतलेल्या आक्षेपावर नवाब मलिकांचे मत

Related Story

- Advertisement -

अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. याचदरम्यान काही वेळापूर्वी काही अनुयांनी एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडेंच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनाला विरोध दर्शवला. वानखेडेंवर घेण्यात आलेल्या या आक्षेपाबद्दल बोलताना नवाब मलिक म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. अभिवादन करणारा व्यक्ती फक्त ठराविक समाजाचा, जातीचाच असायला हवा, असा समज चुकीचा आहे. मला वाटतेय आम्ही दरवर्षी इथे येतोय. पण काही लोकांनीही या वर्षापासून यायला सुरुवात केली हे छान आहे. नुकताच जय भीम नावाचा एक पिक्चर आला आहे. त्या सिनेमात जयभीय हे घोषवाक्य नाही. आता हा सिनेमा तळागाळातल्या समाजाचा संघर्ष दाखवणारा आहे. .त्याप्रमाणेच जो संघर्ष मी सुरू केलेला आहे, त्याचा जयभीम इम्पॅक्ट आता सुरू झाला आहे. त्यामुळे लोक अभिवादन करायला यायला लागले आहे असं मलिक म्हणाले.

- Advertisement -