घरव्हिडिओमहाविकास आघाडीमधील अनेक नेते भाजपमध्ये येणार

महाविकास आघाडीमधील अनेक नेते भाजपमध्ये येणार

Related Story

- Advertisement -

भाजपमध्ये येत्या काळात महाविकास आघाडीमधील अनेक नेते प्रवेश करणार आहेत, असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काही लोक रोज वावड्या उठवतात, की भाजपचे आमदार आमच्याकडे येणार. खरे म्हणजे या वावड्या उठवण्याचे कारण एकमेव आहे. ते म्हणजे कोणीही त्यांच्याकडे जाणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये इतकी प्रचंड अस्वस्थता आहे आणि आमदारांमध्ये इतकी प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे हे आमदार काहीतरी करतील अशी भितीने त्यांना संकेत देण्यासाठी हा आमच्या पक्षात येणार, तो आमच्या पक्षात येणार, अशा प्रकारच्या पुंग्या सोडतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

- Advertisement -