घरव्हिडिओमराठी कलाकार डॉ. आशिष गोखले कोरोना ड्युटीवर

मराठी कलाकार डॉ. आशिष गोखले कोरोना ड्युटीवर

Related Story

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीला अनेक डॉक्टर अभिनेत्यांचा वारसा लाभलेला आहे. डॉ. श्रीराम लागूंपासून ते डॉ. नीलेश साबळे अशी अनेक नावे आहेत. या कलाकारांनी ज्याप्रकारे सामाजिक बांधिलकी जपली त्याचप्रमाणे नव्या दमाचे अभिनेते डॉ. आशिष गोखलेही आपला वाटा उचलत आहेत. सोनी टीव्हीवरील ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेत झळकलेले आणि ‘गब्बर इज बॅक’, ‘मोगरा फुलला’ अशा चित्रपटातून अभिनय केलेल्या आशिष गोखलेंनी आता मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा द्यायला सुरुवात केली आहे. ३१ वर्षीय डॉ. गोखले हे  सिनेसृष्टीत येण्याआधी कोकणात प्रॅक्टिस करत होते.

- Advertisement -