Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ भांडुप येथील घटनेची महापौरांनी केली पाहणी

भांडुप येथील घटनेची महापौरांनी केली पाहणी

Related Story

- Advertisement -

भांडुप येथील व्हिलेज रोडच्या पदपथावर मॅनहोलचे झाकण खचून दोन महिला गटारात पडल्या होत्या. याचा एक सीसीटिव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर मुंबईच्या महापौर घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेले फायबरचे निकृष्ट दर्जाची मेनहोलची झाकणे पालिकेने बदलून आता याठिकाणी लोखंडी मजबूत झाकण लावण्यास सुरुवात केली आहे. याची पाहणी केल्यानंतर महापौरांनी मुंबईच्या पदपथावरील झाकणे बदलून लोखंडी झाकणे बसविणार असल्याचे सांगितले. सदरची झाकणे ही निकृष्ट दर्जाची नसून लोखंडी झाकणे चोरी होऊ लागल्याने ही झाकणे पालिकेने लावली होती. मात्र, पाणी आणि हवेच्या प्रेशरने झाकणे खचली. याबाबत सर्वाना सूचना दिल्या असून पदपथावरील झाकणे लोखंडी करण्याचे सांगितले असून सगळ्या मुंबईत ही झाकणे लावण्यास सांगण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या पावसाळ्यानंतर जो आढावा घेणार आहे त्यात या वॉटर टेबलची शिफ्टिंग करता येईल का? हे पाहणार आहोत.

- Advertisement -