घरव्हिडिओआमदार एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता

आमदार एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता

Related Story

- Advertisement -

ठाणे येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनाबाधित झाले असून सुदैवाने त्यांची अकरा महिन्याची मुलगी प्रियांशी ही मात्र कोरोना निगेटिव्ह निष्पन्न झाली. तिचा सांभाळ शिवसेनेचे बाळा मुदलियार यांची पत्नी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रिनाताई मुदलियार या करत असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिपटॉप प्लाझा येथे जाऊन या चिमुरडीची भेट घेऊन तिची आस्थेने विचारपूस केली. तिला कुटुंबापासून दूर असल्याची जाणीव होऊ नये, या दृष्टीने तिचे पालन व्यवस्थितपणे होत असल्याची खातरजमा केली. तसेच खेळणी, लागत असलेली औषधे अशा वस्तू कुठल्याही परिस्थितीत कमी पडू न देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -