घरव्हिडिओनितेश राणे यांचे विधानसभेतील अनकट भाषण

नितेश राणे यांचे विधानसभेतील अनकट भाषण

Related Story

- Advertisement -

केवळ मुख्यमंत्री कार्यालयातूनच भ्रष्टाचार होत नाहीत. तर मुंबईतील काही इमारती आहेत, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले आहे. केवळ कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले नसून सरकारमध्ये बसलेली लोक लूट करत आहेत, त्यामुळेच आर्थिक संकट निर्माण झाले त्याबाबत विचार करायला हवे असाही आरोप त्यांनी केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबद्दल कोणीच बोलत नाही. वरूण सरदेसाई का मंत्रालयात फिरतात ? कंत्राटदारांना फोन का करतात ? अधिकाऱ्यांना का फोन करतात ? यांना सरकारचा आशिर्वाद का आहे ? यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा का आहे ? याचे उत्तर भेटले हवे. नेमका भ्रष्टाचार कोण करतेय आम्हाला समजायला हवे. मुंबईत काही इमारती आहेत, भ्रष्टाचारामुळेच या इमारतींवर लक्ष ठेवायला हवे असेही ते म्हणाले. मुंबईतल्या वैभव चेंबरमध्ये अधिकारी का जातात ? तिथे का अधिकाऱ्यांच्या रांगा लागतात. तिथे कोण बसते ? हेदेखील तपासायला हवे. महाराष्ट्राच्या जंबो कोविड सेंटरमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेचे धिंधवडे निघाले. निविदा काढण्यासाठीही काही बंगल्यावर गाड्या जमतात. नाईट लाईफ नावाची गॅंग मुंबईत कार्यरत आहे. दिनो मोर्या हा सरकारचा जावई आहे का ? असाही सवाल त्यांनी केला. या सरकारचे दोन आकडे आवडीचे आहेत ५ आणि ८, जोवर आकडा एकू येत नाही तोवर तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही.

- Advertisement -