Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमदार राजू पाटील यांची कोरोना रुग्णांना मदत

आमदार राजू पाटील यांची कोरोना रुग्णांना मदत

Related Story

- Advertisement -

मनसे आमदार राजू पाटील यांच्या डोंबिवली येथील आर. आर. हॉस्पिटलमधून पाच कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आली. आमदार प्रमोद राजू पाटील यांनी कोरोना उपचारार्थ आपल्या स्वत:च्या घरचे आर. आर. हॉस्पिटल समस्त कल्याण-डोंबिवलीकरांच्या प्रेमापोटी मोफत तत्वावर कुठल्या अटीशर्थीविना महापालिकेच्या सरकारी यंत्रणांच्या स्वाधीन केले होते. यावेळी राजू पाटील यांच्या दिलदारवृत्तीचे सर्व स्तरावर कौतुक झाले होते. अद्यावत असलेले हे डोंबिवलीकरांसाठी मोठा दिलासा ठरले असून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संक्रमित झालेले रुग्ण या हॉस्पिटलमधून व्यवस्थित बरे होऊन घरी जात आहेत. डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरातील पाच कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णांनी येथील डॉक्टर्स, स्टाफ आणि केडीएमसी यांचे आभार मानत आपला अनुभव सांगितला.

- Advertisement -