Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकुर्ली पुलावर मनसेचे आंदोलन

ठाकुर्ली पुलावर मनसेचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून कल्याण-डोंबिवली मधील पुलांचे काम फार संथ गतीने चालू आहे. प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून वारंवार वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. मात्र, पूल काही होत नाही. ठाकुर्ली, पालवा, माणकोली, दुर्गाडी पुलाचे काम आद्यपही चालूच आहे. यामुळे नागरिक आणि प्रवाशी हैराण झाले आहे. मात्र, प्रशासन काही वेगाने काम करत नाहीत. याचा निषेध म्हणून डोंबिवली पश्चिम मधील मनसे कार्यकर्त्यांनी १ एप्रिल रोजी अनोखे आंदोलन केले आहे. यावेळी ‘एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवले आमचे कल्याण-डोंबिवलीकरांचे पूल’, ‘एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला ठाकुर्लीचा पूल’ अशा घोषणा देत आंदोलन केले.

- Advertisement -