लोकांच्या स्वप्नाचे आपण निमित्त होतो ही गोष्ट असीम आनंद देणारी

आपलं महानगर आणि माय महानगर आयोजित कोकण बँक पुरस्कृत कलामंदिर दुर्गोत्सवामध्ये नववी दुर्गा म्हणून सहभागी होणाऱ्या नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी अनेक मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुलाखती दरम्यान मुक्ता बर्वे म्हणाल्या, डबलसीट हा चित्रपट पाहून आम्ही घर घेण्याच्या प्रयत्नात उडी घेतली असं सांगणारे अनेक प्रेक्षक मला मला भेटतात. आणि ते त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी माझ्या एखाद्या अभिनयाच्या पात्राचा आधार घेतात त्या वेळेला खूप सुखावून जायला होतं. कुणाच्यातरी स्वप्नांसाठी आपण निमित्त होतो ही गोष्टच असीम आनंद देणारी आहे असं मला वाटतं अशी प्रामाणिक भावना अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केली.