- Advertisement -
सलग चौथ्या दिवशी ठाण्यात पावसाची संततधार सुरु आहे. ठाण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तर सखल भागात पाणी साचलं आहे. महिला आणि पुरुषांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. घरात शिरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. या पावसात प्रशासन कुठेही दिसले नाही, उलट नागरिकांनीच पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी प्रयत्न केल्याचं ठाण्यात दिसत आहे.
- Advertisement -