Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात, कुणाला मिळणार संधी?

नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात, कुणाला मिळणार संधी?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षामध्ये होणारा अंतर्गत कलह लक्षात घेता येत्या 13 तारखेला महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाचा गोंधळ उडाल्याने काँग्रेसमधील दोन गटाचे राजकारण उघडकीस आले. यामध्ये अनेकांचा रोख हा नाना पटोले यांच्यावर असून, पक्षातील अनेक नेत्यांमध्ये पटोलेंविरोधात नाराजीचे सूर उमटले आहेत. 13 तारखेला होणाऱ्या हाय कमांडच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागून राहिलं आहे. नाना पोटोले यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आलं आहे, अशी चर्चा सुरू झाली असून, संभाव्य नावांची चर्चा देखील होत आहे.

- Advertisement -