Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी नारायण राणे यांनी ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी नारायण राणे यांनी ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी सावंतवाडीला गेले होते यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत , दिशा सालियान , पूजा चव्हाण यांच्या मृत्यूवरून नारायण राणे यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान यांच्या खुनाचे पुरावे दिले. मात्र सरकारने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. या प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव अडचणीत सापडले असते. मात्र कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून अटक झाली नाही असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.

- Advertisement -