Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय - नरहरी झिरवळ

मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय – नरहरी झिरवळ

Related Story

- Advertisement -

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची सही तपासून घेणार असल्याचं सांगितलं आहे. कायद्यामध्ये पक्षप्रमुखांनी गटनेता नेमायचा असतो. त्यानंतर गटनेत्याने प्रतोदाची नेमणूक करायची असते. परंतु एकनाथ शिंदे हे विधीमंडाळाचे गटनेता प्रमुख होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिल्यानंतर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली होती. तर सुनील प्रभू यांनीच प्रतोद म्हणून पत्रावर सही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारलं आहे, असं नरहरी झिरवळ म्हणाले.

- Advertisement -