घरताज्या घडामोडीएसटी-रिक्षा भीषण अपघातात 21 जण ठार

एसटी-रिक्षा भीषण अपघातात 21 जण ठार

Subscribe

नाशिक जिल्ह्यावर मंगळवारी (दि.२९) काळाने मोठा घाला घातला. देवळयानजीक मेशी फाट्याजवळ बस व रिक्षाचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर रिक्षा व बस रस्त्याशेजारील विहिरीत कोसळली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला. बस मालेगावकडून कळवण येथे जात होती. बस आणि रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

मेशी फाट्याजवळ मालेगावहून कळवणकडे जाणार्‍या बसचे टायर फुटले. त्यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटून पुढे असलेल्या अ‍ॅपे रिक्षावरती बस आदळली. अपघातानंतर दोन्ही वाहने फरफटत जावून विहिरीत कोसळली. आधी रिक्षा आणि नंतर बस कोसळली. रिक्षामधील सात प्रवासी तर बसमधील चार प्रवासी ठार झाले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत अपघातस्थळी मृतांचा शोध व मदतकार्य सुरु होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह आमदार डॉ. राहुल आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरु केले. काही वेळातच उमराणे, सौंदाणे, माळेगाव फाटा, नांदुरी, देवळा, सटाणा, नांदगाव येथील आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार करत जखमींना मालेगाव व देवळा ग्रामीण रुग्णालयांत दाखल केले. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनीसुद्धा दाखल होत मदतकार्य सुरु केले. रात्री उशीरापर्यंत जखमींना विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

जखमींची नावे

कमलबाई बापू पवार (५०, रा. देवळा), धोंडू दशरथ जाधव (६०, रा. बिजोटे, ता. सटाणा), कल्पनाबाई धोंडू जाधव (५०, रा. बिजोटे, ता. सटाणा), दादाभाऊ दयाराम ह्याळीज (४०, रा. देवळा), बसवाहक कमल लक्ष्मण राऊत (४२), अनिता अमोल पाटील (२५, रा. पाचोरा), अमोल पांडुरंग पाटील (३१, रा. पाचोरा), आदित्य अमोल पाटील (३९), आयुष अमोल पाटील (), लता दादाजी पिटे (३५, रा.मानुर), दादाजी अशोक पिटे (३०, रा.मानुर), दादाजी अशोक पिटे (३०), पुंडलिक मोतीराम पवार (६९, रा.चणकापूर), सुनंदा दीपक बोरसे (२७, तिघेही रा.हिरापूर, ता.चाळीसगाव), देविका दीपक बोरसे (), दीपक दगडू बोरसे (३५).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -