नवी मुंबई ‘एपीएमसी ‘मध्ये कडकडीत बंद

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाली. नवी मुंबईतील एपीएमसीमधील पाचही बाजारांमध्ये आज कडकडीट बंद पाळण्यात आला. संपुर्ण राज्यातून येणाऱ्या शेतमाल आणि फळभाज्यांच्या कोणत्याही गाड्या आज एपीएमसीमध्ये आल्या नाहीत. नवी मुंबई एपीएमसीने याआधीच भारत बंदला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मुंबईकरांना फळ भाजीपाला उपलब्धतेत काहीशा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मुंबईच्या रस्त्यांवर अनेक भागात आज फेरीवाल्यांनाही फळ – भाजीपाला उपलब्ध झाला नाही.