घरव्हिडिओमनसेचे गजानन काळे यांचा आरोग्य मंत्र्यांवर आरोप

मनसेचे गजानन काळे यांचा आरोग्य मंत्र्यांवर आरोप

Related Story

- Advertisement -
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी १ लाख २० हजार कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले. या विधानाला मनसेने आक्षेप घेतला आहे. मुळातच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांच्या वर असत नाही. हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते की आपला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत. याबाबत काही प्रश्न मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित केले आहेत.
- Advertisement -