- Advertisement -
अमरावतीच्या खासदार ‘नवनीत राणा’ यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की, अति करणाऱ्या लोकांची माती होते. अशातच आता माती खाणाऱ्या लोकांचे दिवस आलेत. यातच बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी बुडवली. आणि जर उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांची विचारधारा जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे. याचबरोबर नवनीत राणा यांनी पुढे म्हटलं की, ‘शिवसेना भवन’ देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. यासोबतच निकाल बहुमताने लागला, अशी टीकादेखील यावेळी नवनीत राणा यांनी केली.
- Advertisement -