सध्या देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये देखील कोरोनामुळे हाहाकार माजला असल्याचे चित्र आहे. याच मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत. यातच आता राष्ट्रवादीने देखील भाजपला या मुद्द्यावरून धारेवर धरले आहे. “उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती. परंतु, दोन्ही राज्यांना भाजपाने रामभरोसे सोडले”, असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिराती करून सत्यापासून लांब पळत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजपची भाषा रामराज्याची होती, आता उत्तरप्रदेश-बिहार रामभरोसे सोडले
Related Story
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement