- Advertisement -
नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसर्याच दिवशी जाधव यांनी महापालिकेत येऊन कार्यभार स्वीकारला. कोरोना संकटावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
- Advertisement -