दुग्धर्शकरा योग: मंडळांची छोटी मूर्ती अन् तिही शाडूची!

विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना शिल्लक आहे. मात्र सर्वच सार्वजनिक मंडळातील पदाधिकार्‍यांचा उत्साह कोरोनामुळे यंदा काहीसा मावळलेला आहे. असे असले तरीही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून मंडळांनी उत्सवाच्या तयारीला सुरुवात केलीये. मोठ्या मूर्तींची परंपरा असलेल्या बहुतांश मंडळांनी यंदा आपल्याच बाप्पाच्या मूळ स्वरुपाची छोटी प्रतिकृती बनवून घेण्यासाठी मूर्तीकारांकडे नोंदणी करणे सुरु केले आहे. नाशिकमधील मूर्तीकारांकडे मुंबई, पुण्यातील मंडळांनी अशा मूर्तींची नोंदणी केली जात आहे. महत्वाचं म्हणजे शाडू मातीच्या छोट्या मूर्ती तयार करण्याकडे मंडळांचा कल आहे. त्यामुळे यंदा खर्‍या अर्थाने बाप्पाचा उत्सव हा पर्यावरणपूरक होणार असल्याचे बोलले जाते.

First Published on: July 22, 2020 3:35 PM
Exit mobile version