Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याचे नितीन गडकरींचे आश्वासन

रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याचे नितीन गडकरींचे आश्वासन

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई- गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करणारच, असे आश्वासन दिलं आहे. मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्राच्या कोकणातील 66 पर्यटनस्थळांना जोडतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक देखील होईल. उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनीसुद्धा काम पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिलं आहे.

- Advertisement -