Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई

विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई

Related Story

- Advertisement -

आषाढी एकादशीचा सोहळा २० जुलै रोजी साजरा होणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात पार पडणार आहे. परंतु, असे असताना देखील मंदिर समितीच्यावतीने परंपरेनुसार सर्व तयारी करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर, कळस, नामदेव पायरी, सभामंडप आकर्षक अशा रोषणाईने उजळून निघाले आहे. तर यावर्षी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपावर विठ्ठल, रुक्मिणी आणि सर्व संतांची चलचित्रे भाविकांचे खास आकर्षण बनले आहे. नेत्रदीपक रोषणाईने आसमंत उजळला आहे. ही विद्युत रोषणाई पुणे येथील विठुभक्त विनोद जाधव यांनी देवाच्या चरणी अर्पण केली आहे.

- Advertisement -