घरव्हिडिओऊस संशोधन केंद्राची उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

ऊस संशोधन केंद्राची उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अजित पवारांनी जालन्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस संशोधन केंद्र इमारतीच्या नियोजित जागेची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या. जालन्यातील महाकाळा येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस संशोधन केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. या संशोधन केंद्रामुळे ऊसाच्या नवीन जाती विकसित केल्या जाणार असून ऊसावर पडणाऱ्या रोगांवर देखील संशोधन केले जाणार आहे. युती सरकारच्या काळात मंजुरी न मिळाल्यामुळे या संशोधन केंद्राच्या इमारतीचं काम रखडलं होतं. अखेर महाविकास आघाडी सरकारने वर्षभरापूर्वी महाकाळा या ठिकाणी ऊस संशोधन केंद्राला मंजूरी दिली. त्यामुळे आज अजित पवारांनी केलेल्या जागेच्या पाहणीनंतर ऊस संशोधन केंद्राचं यापुढील काम वेगाने होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -