घर व्हिडिओ दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांची भलीमोठी रांग

दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांची भलीमोठी रांग

Related Story

- Advertisement -
राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीला मंजूरी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेरी ही मोठी रांग लावण्यास तळीरामांनी सुरूवात केली. शासनाने दारू दुकानं उघडण्यासाठी दिलेल्या परवानगीला २४ तासही उलटले नसताना सकाळपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये तळीरामांची दारूच्या दुकानांबाहेर प्रतिक्षा करण्यास सुरूवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही भागात लोकांनी पिशव्या, गोण्या टाकून नंबर लावला आहे. तर पोलीस त्यांना दुकानांबाहेर गर्दी करू नका, असे आवाहन करत आहेत. शिवाय मुंबई, ठाणे, वसई-विरार, रायगड या परिसरातही वाईन शॉपच्या बाहेर मद्यपींनी मोठमोठ्या रांगा लावल्या आहेत. डोंबिवली, उरण, दहिसर, ठाणे, काळाचौकी, शिवाजी पार्क, दादर, नालासोपारा, कासारवडवली, कल्याण, बोरिवली, विरार या परिसरातील वाईन शॉपबाहेरील ही परिस्थिती.
- Advertisement -