घरव्हिडिओप्रशासनाने घटनास्थळी जाऊन घेतला आढावा

प्रशासनाने घटनास्थळी जाऊन घेतला आढावा

Related Story

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीमधील गर्दीमुळे प्रशासन चांगलेच हादरून गेले आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ विविध उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये ‘ब्रेक द चेन’च्या नियमावलीमुळे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. परंतु, काही बाजार समितीमध्ये व्यापारी आणि शेतकरी वर्गाची अलोट गर्दी दिसून आली. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाजार समितीची जबाबदारी ही सभापती यांच्यावर सोडून दिली आहे. त्यामुळे गर्दीला कारणीभूत हे बाजार समितीचे सभापती राहणार आहेत. त्यामुळे आज भुसावळचे पोलीस उपअधीक्षक यांनी बाजार समिती परिसराचा आढावा घेत, त्याठिकाणी उपाय योजनाचा करण्याची आखणी केली. तसेच प्रशासनाने घटनास्थळी जाऊन आढावाही घेतला.

- Advertisement -