घरव्हिडिओपाण्यासोबत तिची दोन मुलं वाहून गेली; २ वर्ष मदतीच्या प्रतिक्षेत

पाण्यासोबत तिची दोन मुलं वाहून गेली; २ वर्ष मदतीच्या प्रतिक्षेत

Related Story

- Advertisement -

वांद्र्यात जलवाहिनी फुटून दोन मुलांचा जीव गेल्यावर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसाठी सुरू झालेली आई पूनम डोईफोडे यांची वणवण गेल्या दोनवर्षांपासून थांबलेली नाही. २०१७ साली मरोळ-रुपारेल जलबोगद्याचे काम केले जात होते. त्यावेळी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास इंदिरा नगर येथील ७२ इंची जलवाहिनी फुटली. पाण्याच्या वेगामुळे शेजारील झोपडी अक्षरश: वाहून गेली. यावेळी नऊ वर्षांची प्रियांका आठ महिन्यांच्या विघ्नेशला मांडीवर घेऊन खेळवत होती. पण, दुर्देवाने या पाण्यात पूनम यांची दोन्ही मुले वाहून गेली. वस्तीच अनधिकृत असल्याने कोणतीही मदत देता येणार नाही, असे सांगत महानगरपालिकेने हात झटकले. मानवतेच्या दृष्टिकोनातून तरी काही मदत मिळावी यासाठी वस्तीतील सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीसाठी अर्ज केला. तलाठ्यांकडे जाऊन अर्ज दिले. पण, आजही पूनम डोईफोडे यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.

- Advertisement -