- Advertisement -
नाशिक जिल्ह्यातील रेड झोनमध्ये २२ मे पासून सर्व प्रकारचे खासगी कार्यालय बंद असतील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊनमधील ४.० मध्ये राज्य सरकारने नवीन नियमावली काढून दिली आहे. त्यानुसार रेड झोनमधील काही गोष्टींवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र नाशिकमध्ये यापुढेही खासगी कार्यालये, कंपन्या बंदच राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
- Advertisement -