- Advertisement -
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘तमाशा लाईव्ह’. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या १५ जुलै रोजी हा भव्य चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे
- Advertisement -