Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रेल्वे पोलिसच ठरला मुलांसाठी सैतान

रेल्वे पोलिसच ठरला मुलांसाठी सैतान

Related Story

- Advertisement -

रेल्वे पोलिसाने पोटच्या दोघा चिमुरड्यांना अमानुष मारहाण केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना इगतपुरीत उघडकीस आली. याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार दिल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल झाला. या नराधम पोलिसाला अटक करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल मोरे याच्या पहिल्या पत्नीला ७ वर्षाचा मुलगा आणि ५ वर्षाची मुलगी आहे. २०१६ मध्ये आईचा दुर्धर आजाराने मृत्यू झाल्यानंतर दोन्हीही मुले पोरकी झाली. त्यानंतर मोरेने २०१७ मध्ये दुसरे लग्न केले. दुसर्‍या पत्नीला ३ वर्षाची मुलगी आहे. मोरे आणि त्याची दुसरी पत्नी हे दोघेही लहान मुलांना दररोज अमानुष मारहाण करत असल्याचे पाहून शेजार्‍यांनी सुरत येथे राहणार्‍या मुलांच्या आजीला फोनद्वारे माहिती दिली होती. मुलांचे हाल पाहून आजीने पोलिसांत धाव घेतली.

- Advertisement -