Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंचा माजी महापौरांना सल्ला

राज ठाकरेंचा माजी महापौरांना सल्ला

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी नाशिकमध्ये आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक यांना आधी तो मास्क काढण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे यांना मास्क घालण्याचे अनेकदा आवाहन केल्यानंतरही ते विनामास्क फिरता असल्याचे दिसून येते. राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. सरकारकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असे असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र ठिकठिकाणी विनामास्क फिरत असल्याचे दिसून येते. लग्न सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये आलेले राज ठाकरे पुन्हा विनामास्क दिसून आले. एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या माजी महापौरांना ‘मास्क काढा’ अशा सूचनाही दिल्या.

- Advertisement -