Tuesday, November 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'अथांग'च्या कालाकारांना मिळाली राज ठाकरेंसोबत फोटो काढण्याची संधी

‘अथांग’च्या कालाकारांना मिळाली राज ठाकरेंसोबत फोटो काढण्याची संधी

Related Story

- Advertisement -

भयावह वाडा… वाड्याबाहेर तुळशी वृंदावन… झाडाला लटकवलेल्या काळ्या बाहुल्या… आजुबाजुचे रहस्यमय वातावरण आणि एक अळवत…. विचारात पडलात ना, हा कोणता देखावा? तर हा थरारक देखावा उभारण्यात आला होता, ‘अथांग’च्या भव्यदिव्य ट्रेलर लाँचसाठी. जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. या सोहळ्याला सर्व कलाकारांनी पारंपरिक पेहरावातून १८००चा काळ पुन्हा एकदा उभा केला. हा दिमाखदार सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून या सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ, दिग्दर्शक अभिजीत पानसे, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, श्रेया बुगडे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी निर्माती तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांच्यासोबत गप्पांची मैफलही रंगवली.

- Advertisement -