Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्र्यांच्या सभेवर नाराजीचा सूर

रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्र्यांच्या सभेवर नाराजीचा सूर

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८ जून रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत या सभेवर रावसाहेव दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पण त्यांच्या प्रतिक्रिये मधून नाराजीचा सूर उमटत आहे. या सभासरम्यान बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, की औरंगाबादच्या सभेसाठी सभेला गर्दी व्हावी म्हणून सगळे प्रयत्न पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. त्याच बरोबर ज्या दिवशी मुख्यमंत्रयांची सभा होणार आहे त्याच्या एक दिवस आधी औरंगाबादच्या रस्त्यांच्या कामांसाठी २२७ कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला. रस्त्यापेक्षाही इथल्या जनतेला पाण्याची जास्त गरज आहे. रस्त्यांची गरज तर इथल्या जनतेला आहेच आणि त्यासाठी निधी दिला त्याबद्दल आभारी आहोत. पण तोच निधी पिण्याच्या पाण्यासाठी दिला असते तर… असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. त्याचबरोबर रावसाहेब दानवे असंही म्हणाले, की पूर्वीच्याकाळी राजा ज्या रस्त्याने जाणार आहे तिथे गर्दी जमावी म्हणून प्रधान त्या रस्त्याने पैसे वाटायचा. एकूणच रावसाहेब दानवे यांची ही प्रतिक्रिया अनुकूल नव्हती

Chief Minister Uddhav Thackeray will hold a meeting in Aurangabad on June 8, said Raosaheb Danve. A day before the Chief Minister’s meeting, a fund of Rs 227 crore was given by the Chief Minister for the road works in Aurangabad. Raosaheb Danve’s reaction was not favorable

- Advertisement -