“त्रिपुराचे मुख्यमंत्री, डावे कोण काय बोलतात म्हणून ममता यांना थांबवता येणार नाही. ममता या नंदीगाम मधून हरल्या हे खरे आहे. मात्र, हरलेले देखील मंत्री आणि केंद्रीय मंत्री झाल्याचा इतिहास आहे. स्मृती इराणी यादेखील निवडणुका हरल्या होत्या. मात्र, त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले. महाराष्ट्रात देखील माजी पंतप्रधान मोराजी देसाई विधानसभा निवडणूक हरले होते. तरी देखील त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे ममता यांना देखील शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकांनी त्यांच्याच नावावर मतदान केलं आहे. आजपर्यंत राज्यपाल शासन होत. आता शपथ घेतल्यावर त्यांचा कारभार सुरू होईल. ममता दीदीच्या नावाने बंगालमध्ये वादळ आलं आणि सर्व विरोधक बंगालच्या खाडीत बुडाले”, अशी टीका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.
दीदींच्या नावाने वादळ आले अन् विरोधक बंगालच्या खाडीत बुडाले
Related Story
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement