Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कळवा हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप

कळवा हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप

Related Story

- Advertisement -
ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती खालावल्याचे सांगत रुग्णांच्या नातेवाईकांना संबंधित रुग्णाला मुंब्र्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. नातेवाईकांनी या खासगी हॉस्पिटलमध्ये धाव घेतल्यानंतर या नावाचा कोणताच रुग्ण दाखल नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर पुन्हा नातेवाईकांना कळवा हॉस्पिटल गाठावे लागले. यावेळी पुन्हा कळवा रुग्णालयाने नवीन दूरध्वनी नंबर दिल्यानंतर तो सिव्हिल रुग्णालयाचा नंबर निघाला. मात्र सिव्हिल पोहोचल्यावर नातेवाईकांना रुग्ण नव्हे तर त्याचे शव ताब्यात घ्यावे लागले. या दोन दिवसांत रुग्णांचा मृत्यू झाला होता. पालिकेच्या कळवा रुग्णालयाच्या गलथान कारभाराची मालिका सुरूच असून आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मृत रुग्णांचे नातेवाईक आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
- Advertisement -