संजय राऊतांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमा प्रश्नावरून धमकी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. यावरून संजय राऊतांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचा स्वाभिमान राहिला नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही तर धमकी देतोय, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा आम्हीसुद्धा रक्त सांडू, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.