Tuesday, May 24, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुनील शिंदेच्या उमेदवारीचे संजय राऊतांनी केले समर्थन

सुनील शिंदेच्या उमेदवारीचे संजय राऊतांनी केले समर्थन

Related Story

- Advertisement -

शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेने टाळले आहे. शिवसेनेचे, खासदार संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. सुनील शिंदे यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -