Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही

शिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही

Related Story

- Advertisement -

शिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाचीही हिम्मत नाही. बुधवारी आलेले लोक कशासाठी आले होते? त्यांचा संबंध काय? शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यावर चाल करण्याचे प्रयत्न केले तर मराठी माणूस गप्प बसेल का? तुम्हाला लिहिता वाचता येत का? आमचे प्रवक्ते काय बोलले ते बघा. जे आरोप झाले त्याची चौकशी करा. कारवाई करा, असे आम्ही म्हणालो. त्यावर मिरच्या का झोंबाव्या? राम मंदिरावर भाजपचे कार्यकर्ते आहेत का? खुलासा विचारणे गुन्हा आहे का ? ज्यांनी बुधवारी प्रयत्न केला, त्याला शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी द्यायला लावू नाका, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -