घरव्हिडिओकळंबोली पुलाखाली भटक्या बालकांसाठी मुक्त शिक्षण

कळंबोली पुलाखाली भटक्या बालकांसाठी मुक्त शिक्षण

Related Story

- Advertisement -

पुणे द्रुतगती मार्गावरील कळंबोली उड्डाण पुलाखाली भटक्या, तसेच झोपडपट्टीतील लहान मुलांकरिता शाळा भरत असून, हे मुक्त शिक्षण जून महिन्यापासून सुरू झाले आहे. सर्व मुले शाळाबाह्य आहेत. आपले सामाजिक दायित्व म्हणून विदर्भ कन्या अनिता कोलते यांनी एकूण १२० मुले आणि मुलींची शाळा सुरू केली आहे. मुंबईमध्ये जवळपास हर्बर लाईन, सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईनमध्ये ५० मुक्त शिक्षण उपक्रम या वर्षांत सुरु करण्याचा कोलते यांचा मानस आहे. या भटक्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी जमेल तशी मदत करण्यासाठी ८८५६९४८८२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोलते यांनी केले आहे.

- Advertisement -