- Advertisement -
लॉकडाऊच्या दरम्यान नाशिक मधून दुसरी ट्रेन रवाना झाली आहे. नाशिक शहर, जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या उत्तर प्रदेशातील कामगार आणि नागरिकांना आज श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लखनऊ येथे पाठविण्यात आले. या ट्रेन मधील नागरिकांशी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधला तसेच ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
- Advertisement -