घरव्हिडिओरुग्णालयातल्या ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला गळती

रुग्णालयातल्या ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला गळती

Related Story

- Advertisement -

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला गळती लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांचे उपचार सुरु होते. परंतु, गळतीमुळे हा ऑक्सिजन वाया गेल्यामुळे रुग्णांना आता नवीन ऑक्सिजन कुठून उपलब्ध करून द्यायचा, असा प्रश्न प्रशासनाच्या समोर निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवताना नाकेनऊ येत आहे. त्यातच ऑक्सिजनचा साठा असलेल्या टाकीच्या पाईपलाईनलाच गळती लागल्याने घबराहट पसरली आहे.

- Advertisement -