- Advertisement -
मी जरी अपक्ष म्हणून निवडून आलेलो असलो तरी मी काही सिद्धांतावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. कैसे छोडू उनको जिनको हराने दुनिया एक हो चुकी है असे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी म्हटलं आहे. जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा उद्धव ठाकरेंना फोन करुन तुमच्या पाठिशी आहे असे सांगितले. आमदार नाराज होते ही वस्तुस्थिती असून राजकीय नाराजी असेल काही कामाच्या बाबतीत असेल त्या त्या वेळी उद्धव साहेबांनी मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला.आम्हाला सर्वाना सूचना दिल्यानंतर आम्ही देखील त्या आमदारांचे काम करण्याचा प्रयन्त केला.काही राहिला असेल मात्र काही आमदारांनी त्यांचा तो निर्णय घेतला आहे. असे गडाख यांनी सांगितले.
- Advertisement -