Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शरद पवारांनी गाजवलं वर्ष २०१९

शरद पवारांनी गाजवलं वर्ष २०१९

Related Story

- Advertisement -
वर्ष २०१९ मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. एका बाजुला सत्ताधाऱ्यांचे आव्हान तर दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती. पक्षातील इतर नेते नाउमेद झालेले असतानाच शरद पवारांनी वयाच्या ८० व्या वर्षी, सुजलेल्या पायांनी फ्रंट फुटवर येऊन जोरदार बॅटिंग केली. शरद पवारांच्या करिष्म्यामुळे राज्यात भाजप विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष असून देखील विरोधात बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “कमीत कमी जागेत सरकार बनवण्याचा चमत्कार फक्त शरद पवारच करु शकतात”. त्यामुळेच शरद पवार ठरत आहेत या वर्षाचे हिरो…
- Advertisement -