- Advertisement -
संसद भवनाच्या परिसरात खासदारांना आणि विरोधकांना आंदोलन करण्यावर तसेच निदर्शन करुन घोषणाबाजी करण्यावर बंदी असेल, असा आदेश लोकसभा सचिवालयाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षातील खासदारांनी सभात्याग केल्यावर ते संसद परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ येऊन मौन करतात. निदर्शनं करतात. या अधिकारांवर बंदी आणण्यात आली आहे. याविरोधात विरोधी पक्षांची भूमिका ठरवण्यात येईल असे शरद पवार म्हणाले
- Advertisement -